प्रा. वामन केंद्रे दोन दशकानंतर रंगभूमीवर!

0

मुंबई – व्यावसायिक रंगभूमीवर कधीही न घडलेली घटना ‘”गजब तुझी अदा” या नाटकाच्या मुहूर्ताला घडली.स्त्री ची जगावेगळी अनोखी अदा असलेलं ” गजब तुझी अदा” या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन व संगीत प्रा. वामन केंद्रे यांचं असुन, तब्बल दोन दशकानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व  भारतातील आघाडीचे दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांचं नवीन कोरं नाटक मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणार आहे.

या नाटकाच्या मुहूर्ताचा नारळ रविंद्र नाट्यमंदिराच्या सफाई कामगार शितल भंडारी आणि हिंदी नाट्य व चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी या दोघींच्या हस्ते नुकताच  रविंद्र नाट्यमंदिरातील तालीम हॉलमध्ये वाढवण्यात आला. रंगभूमीच्या इतिहासात कधीही न आलेल्या अश्या  आगळ्या वेगळ्या विषयाच्या “गजब तुझी अदा” चा शुभारंभ एप्रिल मध्ये होणार आहे.

नाटकाचं नेपथ्य नाविद इनामदार, संगीत संयोजन प्रशांत कदम, सुभाष खरोटे, वेषभूषा  एस. संध्या, प्रकाश योजना शितल तळपदे, नृत्य दिगदर्शन अनिल सुतार यांचं आहे. “गजब तिची अदा” नाटकाची निर्मित गौरी केंद्रे, श्रीकांत तटकरे, दिनु पेडणेकर हे अनामिका, रंगपीठ या संस्थेच्या तर्फे होणार आहे. मुंबई – पुणे पाठोपाठ नाशिक येथील शुभारंभाचा प्रयोग एप्रिल २०२३ मध्ये होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.