नाशिक ( प्रतिनिधी ) उद्या शुक्रवार, ५ नोव्हेंबर २०२१, शुद्ध प्रतिपदा तथा दीपावली पाडव्याला पहाटे ५.०० वाजता साजरी होणारी यंदाची स्वरमैफल देशविदेशात आपल्या अनोख्या गानशैलीमुळे सुपरिचित असलेले स्व. पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य दिल्ली येथील पंडित हरीश तिवारी यांच्या स्वराभिषेकाने रंगणार आहे. पं. हरीश तिवारी यांचे स्वागत आयोजक शाहू खैरे यांनी केले . या प्रसंगी प्रसिद्ध तबला वादक नितीन वारे , गुलाम शेख , रवींद्र कदम , यतीन कुलकर्णी , आनंद ढाकीफळे ,मिलिंद गांधी , प्रदीप पिंगळे आदी उपस्थित होते .
या वर्षीचा मनाचा “संस्कृती गौरव ” पुरस्कार डॉ. अमेय रत्नाकर गायधनी यांना देण्यात येणार आहे . नाशिक मधील तरुण पिढीतील आयुर्वेदामध्ये उपचार करणारे सुप्रसिद्ध धनवंतरी.कोरोना जागतिक महामारी मध्ये नाशिक मधील ज्या अनेक डॉक्टरांनी कोरोना योद्धा म्हणून काम केले त्यातील गायधनी हे आघाडीचे डॉक्टर. स्वतः बनवलेल्या आयुष् काढा आणि आयुर्वेदिक उपचाराने हजारो नागरिकांना नाममात्र शुल्क घेऊन घरीच बरे केले. गेल्या सात पिढ्यांपासून वेद उपासक अशा घराण्यात जन्म झालेला,असून सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून काम करीत आहे.