पं. मधूप मुद्गल यांच्या स्वरांनी रंगणार “संस्कृती नाशिकची” पाडवा पहाट
भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयजी साने यांचा संस्कृती पुरस्काराने होणार सन्मान
‘पाडवा पहाट’ नाशिककर रसिकांच्या काळजातली स्वरमैफल..!
नाशिक,१९ ऑक्टोबर २०२२ – संस्कृती नाशिकच्या वतीने पाडवा पहाटचा हा सुरेल उपक्रम सन १९९८ च्या दीपावली पाडव्या पासून सुरु झाला.संस्थेने नाशिकच्या सांगितीक सांस्कृतीक परंपरेचा वारसा नवोदितांपर्यंत पोहोचावा तसेच भारतातील नामवंत शास्त्रीय गायक कलावंतांच्या गायकीचा नाशिककरांना आस्वाद घेता यावा हा उद्देश डोळ्या समोर ठेवून हा कार्यक्रम सुरु केलाआहे. यंदाच्या वर्षी पाडवा पहाट ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. मधूप मुद्गल दिल्ली यांच्या गायनाची मैफल होणार आहे.अशी माहिती संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी दिली.
आज पावेतो स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, गानतपस्विनी किशोरीताई अमोणकर, शोभा मुद्गल, पं राजन साजन मिश्रा, पंडिता अश्विनी भिडे-देशपांडे, स्वराधीश पं.भरत बलवल्ली,सुरेश वाडकर, यासारख्या अनेक मान्यवर गायकांच्या स्वराभिषेकाने पिंपळपार चिंब झाला आहे. देशविदेशात पाडवा पहाटचा स्वराविष्कार नाशिकची सांस्कृतीक ओळख ठरला आहे..!
गायनाच्या कार्यक्रमां व्यतिरिक्त संस्थेने शिव व्याख्याते श्री. सचिन कानिटकरांची व्याख्यानमाला, हुतात्मा शौर्य शताब्दी सोहळा, ग्रंथयात्रा असे असंख्य सांस्कृतीक कार्यक्रम अत्यंत देखण्या स्वरूपात सादर केले आहेत.
यंदाच्या वर्षी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. मधूप मुद्गल दिल्ली यांच्या गायनाची मैफल होणार आहे. त्यांना त्याचे वडील पं विनयचंद्र मुद्गल. पं.जसराजजी, पं कुमार गंधर्व यांचे शिष्यत्व आणि मार्गदर्शन लाभले आहे. पंडितजींना तबला साथसंगत पं. श्री.शंभूनाथ भटटाचार्यजी आणि संवादिनी साथ पं.श्री. अरविंदजी थत्ते हे करणार आहेत.
या मैफलीच्या निमिताने आपल्या परंपरेनुसार या वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याकरीता संस्कृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.