नाशिक (वार्ताहर) : नाशिक नगरीला असलेला इतिहास पुराणाची परंपरा आणि वर्तमान काळात नाशिकचे होणारे विकसन हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. यावर विशेष चिंतन करून भविष्यदर्शी भाष्य करणारे धनंजय बेळे लिखित आणि शब्दमल्हार प्रकाशन प्रकाशित एम एच 15 हे पुस्तक शनिवार दि.२५ डिसेंबरला प्रकाशित होत आहे.
नाशिक नगरी विद्यमान काळात देशातील महत्त्वाची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे; पण या नगरीचा नेमका विकास कसा व्हायला हवा, हे रचनात्मक कार्य पुढे नेण्याची जबाबदारी कुणाची आहे आणि ती कुणीकुणी प्रत्यक्षात आणायला हवी याबद्दलचे विचार धनंजय बेळे यांनी प्रस्तुत एम एच 15 या पुस्तकात मांडले आहेत.
या प्रकाशन सोहळ्यास नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, माजी पोलीस महानिरीक्षक व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रतापराव दिघावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी साडेतीन वाजता प्रकाशन सोहळा होणार असून समस्त नाशिककरांनी या जिव्हाळ्याच्या विषयावरील पुस्तकाच्या प्रकाशनास उपस्थित राहावे असे आवाहन धनंजय बेळे आणि शब्दमल्हार प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.