पुणे, १६ जून २०२५:Pune Bridge Collapse Photo तळेगावजवळील कुंडमळा येथे रविवारी सायंकाळी इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याने मोठा हाहाकार माजला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू, तर ३० हून अधिक जखमी झाले असून अनेक पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळी दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरु आहे.
🖼️ दुर्घटनेपूर्वीचा थरारक फोटो समोर(Pune Bridge Collapse Photo)
दुर्घटनेच्या काही क्षणांपूर्वी काढलेला एक धक्कादायक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत पूल लोकांनी गच्च भरलेला दिसत असून, काही सेकंदांतच तो कोसळणार याची कुठेच चाहूल नाही. गर्दी, दुचाकी आणि अरुंद पूल ही यामागील मुख्य कारणं असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
🚧 “पूल वापरास बंद” फलक लावलेला होता – पण कुणी ऐकलं नाही!
प्रशासनाने पूल वापरासाठी बंद असल्याचा फलक लावला होता, मात्र त्याकडे कोणीही दुर्लक्ष केलं. ३० वर्ष जुना आणि कमकुवत झालेला पूल वाहतुकीसाठी योग्य नसतानाही खुला ठेवण्यात आला, यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
⚠️ काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या दुर्घटनेबाबत सरकारवर थेट आरोप करत म्हटले की –
“पूल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाचे बळी आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा.”
ते पुढे म्हणाले की, “निधी मंजूर होऊनही वर्षभरात काम न करणं म्हणजे दुर्घटनेची वाट पाहणं. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही.”
🔍 उपमुख्यमंत्र्यांचे आदेश,पण उशिराने
दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हे उपाय दुर्घटनेनंतरचे ‘वरातीमागून घोडे’ प्रकार असल्याची टीका होत आहे.
📌 थोडक्यात –
कुंडमळा येथील पूल कोसळून ४ ठार, ३०+ जखमी
पुलावरची गर्दी, दुचाकी आणि प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत
दुर्घटनेपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
काँग्रेसचा सरकारवर टीका, गुन्हे दाखल करण्याची मागणी
स्ट्रक्चरल ऑडिटचे उशिराने दिलेले आदेश