Pune : वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर:पुण्यात तिरंगी लढत

पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट 

0

पुणे ,दि.२ एप्रिल २०२४ –पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. पुण्यातली सध्याची लढाई ही भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि मविआच्या रवींद्र धंगेकरांमध्ये होती.आता यात वसंत मोरे यांची एन्ट्री झाली आहे.वंचित बहुजन आघाडीकडून पुण्याच्या जागेवर वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे.

भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली गेली आहे.तर आता वसंत मोरे यांनी देखील दंड थोपटल्याने पुण्यातील लोकसभेची लढत अधिक चुरशीची होणार आहे. वंचितने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली.तिघंही पुणे महापालिकेत नगरसेवक होते. मुरलीधर मोहोळ नंतर महापौर झाले.तर,रवींद्र धंगेकर गटनेते होते.वसंत मोरे यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. रवींद्र धंगेकरांनी नंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदारकी पटकावली. मात्र, वसंत मोरे यांना नगरसेवकाच्या वर जाता आलं नाही. मात्र, मनसेला रामराम ठोकून वसंत मोरे यांनी शड्डू ठोकले होते.

वंचितने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात वंचित उमेदवार देणार नाही, अशी घोषणा देखील केली आहे. बारामतीत शरद पवार गटाला वंचितचा पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलंय.

वंचितकडून जाहीर झालेल्या यादीत नांदेडच्या जागेवर अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिलीये. तर परभणीतून बाबासाहेब उगले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर मधून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिरूरमधून वंचितने मंगलदास बांदल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.