प्रॅक्टिसिंग व्हॅल्युअर्स असोसिएशन ऑफ इंडिया राष्ट्रीय कार्यशाळेचे नाशिकमध्ये आयोजन

देशभरातील व्हॅल्युअर्स होणार सहभागी

0

नाशिक, दि. १९ ऑगस्ट २०२५ PVAI National Workshop Nashik भारतातील अर्थकारण, रिअल इस्टेट, शेअर्स, उद्योग, मशिनरी आणि गुंतवणुकीसारख्या सर्व क्षेत्रांसाठी योग्य व पारदर्शक मूल्यांकनाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिसिंग व्हॅल्युअर्स असोसिएशन ऑफ इंडिया (PVAI) PVAI-VPO यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन २२, २३ आणि २४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सयाजी हॉटेल, इंदिरानगर, नाशिक येथे करण्यात आले आहे.ही कार्यशाळा PVAI चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुनील भोर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून देशातील नामवंत व्हॅल्युअर्स मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून तज्ञांचा सहभाग(PVAI National Workshop Nashik)

या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी भुवनेश्वर, दिल्ली, हैदराबाद, गुजरात, मदुराई, जळगाव यांसारख्या शहरांमधील नामांकित व्हॅल्युअर्स सहभागी होणार आहेत. या उपस्थितीमुळे कार्यशाळेला सर्वसमावेशकता आणि वैविध्य लाभणार असून, नाशिककर व्हॅल्युअर्सना थेट राष्ट्रीय स्तरावरील अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

कार्यशाळेतील विषय व मार्गदर्शन

या कार्यशाळेत व्हॅल्युअर्सना विविध प्रकारच्या मूल्यांकन प्रक्रियांबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यात विशेषतः खालील मुद्द्यांचा समावेश असेल :

बँकिंग व्हॅल्युएशन्स : कर्ज प्रक्रियेसाठी मालमत्ता व संपत्तीचे मूल्यांकन कसे करावे याबाबत तांत्रिक मार्गदर्शन.

इनकम टॅक्स व्हॅल्युएशन्स : आयकर कायद्यातील तरतुदींनुसार संपत्तीचे मूल्यांकन.

कॅपिटल गेन टॅक्ससाठी व्हॅल्युएशन्स : भांडवली नफ्यावर कर लावण्याच्या बाबतीत अचूक मूल्यांकनाचे महत्त्व.

इतर क्षेत्रांतील व्हॅल्युएशन्स : रिअल इस्टेट, मशिनरी, प्रकल्प व शेअर्ससंबंधी मूल्यांकन पद्धती.

या विषयांवर राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ आपले मार्गदर्शन करणार आहेत.

PVAI नाशिक केंद्राचे उद्घाटन

या कार्यशाळेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे २२ ऑगस्ट २०२५ रोजी PVAI नाशिक केंद्राचे उद्घाटन.

या सोहळ्यास अ‍ॅड. अविनाशजी भिडे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर श्री. रतनजी लथ प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

नवीन PVAI नाशिक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून ते असे

चेअरमन : श्री. प्रशांत हरचंद पाटील

व्हाईस चेअरमन :  श्री. अमित अलाई

सचिव :  श्री. हर्षल धांडे

खजिनदार :  श्री. राजेश मुळाणे

याशिवाय रवींद्र के. सिंग,  गुणवंत चौधरी,  मनीष पवार यांची सल्लागार मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. तर  योगेश चांडक,  महेंद्र शिरसाट, महेंद्र चौधरी, हर्षद भामरे, तेजस मोरे, अखिलेश बोरस्ते, विकास ब्राह्मणकर यांची कार्यकारी समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारींची उपस्थिती

या कार्यशाळेला PVAI चे खालील राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत :

 महेश मिस्त्री राष्ट्रीय सचिव

.माधव हुंडेकर राष्ट्रीय उपाध्यक्ष

वेंकटेश्वरराव एम.व्ही राष्ट्रीय ज्यु. सचिव

 अंकित मोहबंसी राष्ट्रीय कोषाध्यक्ष

. एम.व्ही. मोहनकृष्णन राष्ट्रीय उपाध्यक्ष

तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, केंद्र अध्यक्ष व कॉर्पोरेट सदस्य कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

PVAI चे कार्य व उद्दिष्टे

प्रॅक्टिसिंग व्हॅल्युअर्स असोसिएशन ऑफ इंडिया (PVAI) ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून देशातील मूल्यांकन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांना एकत्र आणत आहे. तिची मुख्य उद्दिष्टे अशी आहेत

व्हॅल्युअर्सना व्यासपीठ : अनुभव व ज्ञानाची देवाणघेवाण.

नियम व कायदे मार्गदर्शन : नवीन कायदे व तांत्रिक बाबींबाबत प्रशिक्षण.

प्रशिक्षण व कार्यशाळा : विविध संपत्ती वर्गांचे अचूक मूल्यांकन.

शासकीय धोरणांवर सल्ला : धोरण रचनेत व्यावसायिक सूचना.

पारदर्शकता व नैतिक मूल्ये : आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे काम.

करिअर संधी व नेटवर्किंग : तरुण व्हॅल्युअर्सना करिअर विकासात मदत.

मूल्यांकन व्यवसायाचे महत्त्व

बँका व वित्तीय संस्था कर्ज देताना तारण मूल्यांकन करतात.

कोर्ट केस, कर वसुली, इनकम टॅक्स, कंपनी कायदे यामध्ये योग्य मूल्यांकन आवश्यक असते.

गुंतवणूक व उद्योग क्षेत्रात वास्तविक किंमत ठरविण्यासाठी व्यावसायिक व्हॅल्युअर्सची मदत घेतली जाते.

म्हणूनच, अचूक व विश्वासार्ह मूल्यांकन हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक अत्यावश्यक पाया आहे.

नाशिककरांसाठी सुवर्णसंधी

नाशिकसारख्या वाढत्या शहरात रिअल इस्टेट, औद्योगिक गुंतवणूक व शेअर्स मार्केटचा झपाट्याने विकास होत असताना, ही राष्ट्रीय कार्यशाळा नाशिककरांसाठी मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. स्थानिक व्हॅल्युअर्सना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहिती व अनुभव थेट मिळणार असून, त्यांच्या व्यावसायिक विकासाला नक्कीच चालना मिळेल.२२ ते २४ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणारी PVAI ची ही राष्ट्रीय कार्यशाळा नाशिकच्या सांस्कृतिक व व्यावसायिक वैभवात नवा आयाम जोडणारी ठरणार आहे.देशभरातील तज्ञ व्हॅल्युअर्सच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम नाशिकच्या व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!