नाशिक,दि,४ सप्टेंबर २०२४ –देशभरामध्ये लहान मुलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विचार करता प्रत्येक लहान मुलाला गुड टच आणि बॅड टच याबद्दल प्रशिक्षण देणे गरजेचे आहे याचाच विचार करून 98.3 रेडिओ मिरची आणि नाशिक स्कूल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरची सेफ अँड साऊंड हा उपक्रम गेली सहा दिवस नाशिकमध्ये राबवण्यात आला ज्यामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मुलांना इस्पेलियर स्कूलच्या शिक्षकांनी गुड टच आणि बॅड टच याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले याचाच पुढचा टप्पा म्हणून आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी शंकराचार्य संकुलात एका टॉक शो चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये लहान मुलांवरती होणारे लैंगिक अत्याचार या विषयाला धरून सगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन तेथे जमलेल्या शिक्षक आणि पालकांना करण्यात आले,
या टॉक शोमध्ये नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील सर,बालरोग तज्ञ डॉ.तृप्ती महात्मे , फेलो होमिओपॅथिक मानसोपचार तज्ञ डॉ. वृषीनित सौदागर, शिक्षण तज्ञ सचिन जोशी सर यांना आर जे भूषण यांनी बोलते केले, या मध्ये लैंगिक शोषण या संदर्भातले कायदे, लैंगिक शोषणाचा लहान मुलांच्या मनावर होणारा परिणाम आणि पालक शिक्षक यांनी लहान मुलांची घ्यावयाची काळजी या बाबींवरती सविस्तर चर्चा करण्यात आली,
तसेच जमलेल्या समस्त शिक्षक आणि पालक वर्गाला गुड टच आणि बॅड टच याचे ट्रेनिंग देण्यात आले जे त्यांनी त्यांच्या संपर्कातील लहान मुलांना शिकवावे असे आवाहनही करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक समाज चे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीनजी ठाकरे,भोसला मिलिटरी कॉलेजचे विश्वस्त जयंत खेडेकर सर आणि इतर सगळ्या शाळांचे प्राचार्य आणि मान्यवर उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते हा कार्यक्रमात इस्पेलियर स्कूल नाशिक, शिक्षण उपसंचालक नाशिक , नाशिक पोलीस आयुक्तालय, इंडियन अकॅडमी ऑफ पेडिट्रीशियन नाशिक , नम्रता ऍडव्हर्टायझिंग यांच्यां सहकार्याने पार पडला.