राहुल गांधींचा गंभीर आरोप :”निवडणूक आयोगाने भाजपसाठी मतं चोरली, माझ्याकडे १००%पुरावे”
हा बॉम्ब फुटला, की देशात निवडणूक आयोग उरलेला दिसणार नाही.
📅 नवी दिल्ली, दि. १ ऑगस्ट २०२५–Rahul Gandhi News काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर थेट आरोप केला आहे की, “निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी मतांची चोरी केली असून, माझ्याकडे याचे १०० टक्के ठोस पुरावे आहेत.”
राहुल गांधी म्हणाले, “हे मी अतिशय गांभीर्याने सांगतोय. जर हे पुरावे आम्ही जनतेसमोर आणले, तर देशाला कळेल की निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणे काम करत आहे. आयोगात बसलेल्यांना आम्ही सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं.”
👉 काय म्हणाले राहुल गांधी?(Rahul Gandhi News)
“माझ्याकडे निवडणूक आयोगाने भाजपसाठी मतं चोरल्याचे अचूक पुरावे आहेत.”
“हे पुरावे म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील अॅटम बॉम्ब आहे.”
“हा बॉम्ब फुटला, की देशात निवडणूक आयोग उरलेला दिसणार नाही.”
“या प्रकरणात सहभागी असलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच.”
🗳️ कोणत्या निवडणुकांचा उल्लेख?
राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यांचा स्पष्ट उल्लेख केला. ते म्हणाले, “मध्यप्रदेशात संशय होता, महाराष्ट्रात तो बळावला. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तब्बल एक कोटी नविन मतदार अचानक वाढले. यावर संशयासारखी स्पष्टता निर्माण झाली.”
🔍 काँग्रेसने केलेला स्वतंत्र तपास
निवडणूक आयोगाकडून सहकार्य मिळत नसल्याने, काँग्रेसने स्वतः तपास करून ६ महिन्यांत पुरावे गोळा केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. “आता ही माहिती सार्वजनिक केल्यावर देशभर खळबळ उडेल,” असेही ते म्हणाले.
⚖️ “कोणीही सुटणार नाही”
राहुल गांधी यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जे अधिकारी मतांची चोरी करत आहेत ते निवृत्त झाले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही, कारण ते देशाविरोधात काम करत आहेत.”