महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता :जाणून घ्या देशातील हवामान स्थिती

मुंबई, ठाणेसह पालघरला येलो अलर्ट; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता

0

मुंबई,दि.२५ नोव्हेंबर २०२३ – बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी ऊन, कधी पाऊस असं चित्र पाहायला मिळत आहे.IMD च्या अंदाजानुसार , आज पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात राज्य, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश,कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील ४ दिवस देशाच्या अनेक भागात हवामान खराब असणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिना जवळजवळ संपत आला आहे. मात्र थंडीत वाढलेली नाही. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या आकडेवारीनुसार, पूर्वेकडील चक्रीवादळ पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल. त्यानंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

तसेच महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील ४८ तासांत मुंबई , ठाणे या सह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मुंबईत २५ आणि २६ नोव्हेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD ने आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. चेन्नईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. चेन्नईच्या आसपासच्या भागात खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. आज केरळ आणि माहेमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह (ताशी 30-40 किमी वेगाने) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.