राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा धोका

0

मुंबई,दि,५ जानेवारी २०२३ –महाराष्ट्रात मुंबई,पुण्यासह इतर महत्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आहे.तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलाय.

पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सांगली शहरात रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे. रात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पावसाचे थेंब पडले. अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस पावसाचा अंदाज आहे, तर रायगडमध्ये रविवारी हलका पाऊस पडू शकतो.उत्तर मध्य भारतात धुळे, नंदुरबार येथेही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी,शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.