उत्तर भारतात पावसाचा कहर!दिल्ली-एनसीआरमध्ये १५ जणांचा मृत्यू,शाळा बंद,अनेक गाड्या रद्द

व्हिडीओ पहा

0

नवी दिल्ली,दि.९ जुलै २०२३ –रविवारी संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान १५ जणांचा मृत्यू झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, हवामानाचा प्रभाव पुढील २ ते ३ दिवस कायम राहील. त्यामुळे दिल्ली, गुरुग्राम, नोएडा येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर अमरनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे. इकडे पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की, १९८२ पासून, दिल्ली NCR मध्ये जुलैमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आम्ही दिल्लीत पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस येथे पाऊस पडेल, परंतु त्याची तीव्रता कमी असेल.पुढील २४ तासांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.