राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट: मनसे ३ जागांसाठी आग्रही ?

0

नवी दिल्ली,दि १९ मार्च २०२४ – महायुतीत लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात असतांनाच आता शेवटच्या क्षणी मनसे प्रमुख राज ठाकरेंची एन्ट्री झाली आहे.कारण भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत मनसेला घेण्याच्या निर्णय झाला असून,यावर महायुतीमधील सर्व मित्रपक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती मिळत आहे.

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान मनसेकडून दक्षिण मुंबई ,नाशिक किंवा शिर्डी  या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील यासाठी संमती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा भाजपला हवी असून, शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे.

लोकसभेला मनसेला जास्त जागा देणे शक्य नसले तरी विधानसभा निवडणुकीत मनसेला जास्त जागा देऊ असं सांगण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. भाजपा नेते,केंद्रीय गृहमंत्री यांच्या बरोबरआज झालेल्या बैठीकी बाबत राज ठाकरे मुंबईत येऊन पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.