राज ठाकरे चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल : मनसे महायुतीत सहभागी होणार ?

0

मुंबई,दि, १८ मार्च २०२४- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत.दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. \राज ठाकरे  हे दिल्लीला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.आज  रात्री ११ नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित  शाह  यांच्या निवासस्थानी राज ठाकरे यांची बैठक होणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे आज रात्री दिल्लीत भाजप आणि मनसे  युतीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी भाजपकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ही मनसेसाठी सोडली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु, दरवेळीप्रमाणे भाजप-मनसे युतीची चर्चा हवेतच विरणार,असे अनेकांना वाटले होते. मात्र,मंगळवारी रात्री राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याने दोन्ही पक्षांमधील युतीबाबत काहीतरी ठोस घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज ठाकरे हे दिल्लीत गेल्यानंतर थेट भाजप मुख्यालयात किंवा अमित शाह यांच्या निवासस्थानी जातील,अशी सूत्रांची माहिती आहे.देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीत असल्याने लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत सामील करुन घेण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. यावेळी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्यासमोर काय प्रस्ताव मांडतात, हे पाहावे लागेल.

राज ठाकरे ज्याअर्थी मुंबईची वेस ओलांडून दिल्लीला गेले आहेत, त्याअर्थी त्यांना भाजपकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळाले असावे.आता दिल्लीवारीत त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.आतापर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु, या भेटीगाठींपलीकडे दोन्ही पक्षांमधील युतीच्यादृष्टीने काही ठोस घडले नव्हते.मात्र,लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने भाजप-मनसे युती प्रत्यक्षात येऊ शकते.राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील आहेत.

राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर मनसेचा महायुतीत समावेश दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाण्याची शक्यता आहे.अशावेळी मनसेचा दक्षिण मुंबईतील उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगली आहे. सद्यपरिस्थितीत राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मुंबईच्या राजकारणात ओळखीचा चेहरा असणाऱ्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय, शिंदे गट आणि भाजपमध्ये ज्याच्यावरुन वाद सुरु असलेला ठाणे मतदारसंघही मनसेला सोडला जाईल,अशी चर्चा सुरु आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.