राज ठाकरेंचा मराठी स्वाभिमानासाठी ५ जुलैला विराट मोर्चा ,हिंदी सक्तीविरोधात एल्गार
राज ठाकरेंचं मोठं विधान, ठाकरे बंधू एकत्र येणार?
मुंबई, दि. २६ जून २०२५ — Raj Thackeray Marathi Protest महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत ५ जुलै रोजी विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, परंतु हा “मराठी माणसाचा” मोर्चा असेल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.या मोर्च्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येणार का ? या कडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे… pic.twitter.com/BUN1Av0GSK— Raj Thackeray (@RajThackeray) June 26, 2025
🔥 मोर्चाचे ठळक मुद्दे:
५ जुलै २०२५, सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा सुरू होईल आणि आझाद मैदानावर जाईल.
कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. मोर्चा संपूर्णपणे मराठी अस्मितेसाठी असेल.
राज ठाकरे यांनी सर्व पक्षांना आणि खास करून उद्धव ठाकरे यांना या मोर्चाचे निमंत्रण दिले आहे.
“महाराष्ट्र वाचवायचा असेल तर कोणत्याही वादापेक्षा ‘महाराष्ट्र’ मोठा आहे,” असं ठाम विधान राज ठाकरेंनी केलं.
🗣️ प्रेस कॉन्फरन्समधील १० महत्त्वाचे मुद्दे (संक्षेप):(Raj Thackeray Marathi Protest)
हिंदी सक्ती फेटाळून लावत NEP च्या चुकीच्या अंमलबजावणीवर टीका.
महाराष्ट्रात सीबीएसई शाळांच्या वर्चस्वाविरोधात आवाज.
भाषेच्या नावाखाली सुरू असलेल्या “मराठीपणाच्या काढ्या”चा निषेध.
सर्वपक्षीय आणि जनतेसाठी खुला मोर्चा — “हा महाराष्ट्रासाठी लढा आहे”.
“कट” हा शब्द वापरत भाषावादी धोरणांचा पर्दाफाश.
मोर्चाला कोण येतंय आणि कोण नाही हे जनता पाहणार.
ठाकरे गटासह इतर पक्षांशी संवाद, निमंत्रण देण्याचे स्पष्ट संकेत.
रविवार निवडलेला विशेषतः लोकांचा जास्त प्रतिसाद मिळावा म्हणून.
कलाकार, साहित्यिक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे आवाहन.
जेएनपीटी, अदानी पोर्टसारख्या विषयांवरही प्रश्न उपस्थित.
📣 राज ठाकरेंचा इशारा:
“हिंदी किंवा कोणत्याही भाषेची सक्ती सहन केली जाणार नाही. ही महाराष्ट्राची लढाई आहे. कोणताही वाद नको, फक्त मराठीपण जपण्याचा संकल्प हवा.”
[…] […]
[…] धोरणाविरोधातील यशस्वी लढ्यानंतर ठाकरे बंधूंनी – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – […]