मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगितकरण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून चर्चेच असलेला हा अयोध्या दौरा राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.
राज ठाकरे हे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम आहेत. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. दौऱ्याची पुढील तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, “तूर्तास अयोध्या दौरा स्थगित… महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच… रविवार दि. २२ मे, सकाळी १० वा. स्थळ – गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे” असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.
एकीकडे राज ठाकरेंना विरोध होत असताना दुसरीकडे कांचनगिरी यांनी त्यांची बाजू घेतली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना रोखूनच दाखवावं, असं म्हणत राज ठाकरेंची बाजू घेतली होती. यावेळी राज ठाकरेंते तोंडभरुन कौतुकही केलं होतं.दरम्यान रविवारी पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022