सोनम बेवफा : SITचे पुरावे पाहिल्यानंतर सोनमचा खोटेपणा आला समोर
भयंकर कटकारस्थानाचा पर्दाफाश :'ऑपरेशन हनीमून'ने उघडकीस आणले राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे रहस्य
नवी दिल्ली | ११ जून २०२५ – Raja Raghuvanshi Death Mystery राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे.‘ऑपरेशन हनीमून’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या मेघालय पोलिसांच्या या तपासात सोनम रघुवंशी हीच तिच्या नवऱ्याच्या हत्येची मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसआयटीच्या समोरासमोरच्या चौकशीत सोनमने आपल्या पतीच्या हत्येतील सहभागाची कबुली दिली आहे.
हनीमूनचा बहाणा आणि भयंकर कट (Raja Raghuvanshi Death Mystery)
११ मे रोजी लग्न झाल्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम मेघालयला हनीमूनसाठी गेले. मात्र हे हनीमून खरे नसून, राजा रघुवंशीच्या हत्येचा एक सुनियोजित कट होता. २३ मे रोजी राजा रघुवंशी गायब झाला आणि २ जून रोजी त्याचा मृतदेह चेरापुंजीजवळील एका खोल दरीत आढळून आला.
प्रेमसंबंध, षड्यंत्र आणि सुपारी
मेघालय पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, सोनमचा राज कुशवाहा नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होता. हाच राज मुख्य सूत्रधार होता. सोनमने तीन सुपारीखोर – आकाश राजपूत (१९), विशाल सिंह चौहान (२२), आणि आनंद कुर्मी – यांना या कामासाठी कामावर ठेवले होते. यासाठी २० लाख रुपयांची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पण याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती आली नाही
हत्या कशी घडली?
२३ मे रोजी सकाळी ५.३० च्या सुमारास नोंग्रियाट येथून चेक-आउट केल्यानंतर कपल चेरापुंजीच्या दिशेने निघाले. सोनमने वाटेत मुद्दाम पाय कमी टाकत मागे राहून तीन साथीदारांना वेळ दिला. सुमारे २,००० पायऱ्या चढून गेल्यानंतर वेई सावडोंग धबधब्याच्या परिसरातच सोनमने इशारा दिला आणि त्या ठिकाणी राजावर हल्ला करून त्याला दरीत फेकण्यात आले.
चतुराईने तयार केलेले खोटे कव्हर
हत्या केल्यानंतर सोनमने सोशल मीडियावर “सात जन्मों का साथ” असे लिहून राजा सोबतचा फोटो पोस्ट केला. यानंतर दोघे गायब झाल्याचे कळताच शोध मोहिम सुरू झाली. २ जूनला राजा मृतावस्थेत सापडला, आणि ९ जूनला सोनमने गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथील पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
अटक आणि पुढील तपास
या प्रकरणात आरोपी आकाश, विशाल, आणि आनंद यांना उत्तर प्रदेश व इंदौरमधून अटक करण्यात आली आहे. प्रमुख सूत्रधार राज कुशवाहा यालाही अटक करण्यात आली आहे. सोनम सध्या न्यायालयीन कोठडीत असून मेघालय पोलिस अधिक तपास करत आहेत.ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, सत्य शोधण्यासाठी पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
[…] सरकारी बसमध्ये परतीच्या प्रवासात मोबाईलवर राजा रघुवंशीचा इंस्टाग्राम रील पाहत […]