राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर: जेपी नड्डा आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी 

0

नवी दिल्ली,दि,१४ फेब्रुवारी २०२४ – भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections )नवी यादी जाहीर केली असून, त्यात ७ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तत्पूर्वी आज पक्षाने इतर ५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभा निवडणुकीसाठी नवी यादी जाहीर केली असून, त्यात ७ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तत्पूर्वी आज पक्षाने इतर ५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नामांकनाची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नव्या यादीत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा ( JP Nadda)यांचे नाव आहे, त्यांना गुजरातमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपने गुजरातमधून गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि जशवंतसिंग सलामसिंग परमार यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपचाडे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपची दुसरी यादी आज जाहीर 
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आज दुसरी यादी जाहीर केली. यापूर्वी भाजपने ५उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पक्षाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना ओडिशातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पक्षाने मध्य प्रदेशातून डॉ. एल. मुरुगन, उमेशनाथ महाराज, माया नरोलिया आणि बन्सीलाल गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.