रक्षाबंधनावर भद्रा योगाचे सावट ?:जाणून घ्या राखी बांधण्याची सर्वात शुभ मुहूर्त कोणता
सुप्रसिद्ध जोतिष अभ्यासक मंगेश पंचाक्षरी काय सांगता जाणून घेऊ या !
नाशिक,दि. २९ ऑगस्ट २०२३ –रक्षाबंधनाचा सण प्रत्येक भावा बहिणीच्या मनाच्या अगदी जवळचा असतो. दरवर्षी भावा-बहिणीचा पवित्र सण मोठ्या प्रेमाने आणि थाटामाटात साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. यंदा हा उत्सव ३०आणि ३१ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे असे जाणकार सांगतात .
सुप्रसिद्ध जोतिष अभ्यासक मंगेश पंचाक्षरी सांगतात की बुधवार,३० ऑगस्टरोजी सकाळी १०.५९ पासून पौर्णिमा लागते. परंतु लगेच भद्राकाल योग असल्याने रक्षाबंधन रात्री ९.०२ नंतर करावे असा मतप्रवाह वहात आहे. त्याला आधार म्हणून काही जण उदाहरण देतात की रावणाच्या हातात शूर्पणखेने भद्राकालात राखी बांधल्याने रावणाचे फार वाईट झाले. पण तो पाताळ भद्राकाल होता,यावेळी पृथ्वीलोकी भद्राकाल असल्याने दोष नाही म्हणून ३० तारखेला सकाळी ११.०० नंतर रक्षाबंधन करावे.
(भद्रा म्हणजे सूर्याची मुलगी, शनीची बहीण.जेव्हा विष्टी करण असते तेव्हा त्यास भद्रा म्हणतात. चंद्र जेव्हा मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक राशीत असतो तेव्हा भद्रा स्वर्गात असते. चंद्र जेव्हा कन्या, तुळ, धनु, मकर राशीत असतो तेव्हा भद्रा पाताळात असते, चंद्र जेव्हा कर्क, सिंह, कुंभ, मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर असते.)
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मोबाईल-8087520521