११ यजमानांच्या उपस्थितीत होणार रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

मूर्ती उभारणीच्या जागेपासून होणार पूजेला सुरुवात : द्वादश अनुष्ठानाचं आयोजन

0

अयोध्या दि,८ जानेवारी २०२४ –(निवेदिता मदाने – वैशंपायन) बहुप्रतिक्षित राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. तर, काहीजण आताच जाऊन अयोध्येतील भव्य निर्माणाधीन राम मंदिर पाहून येत आहेत. १०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता तो संपुष्टात आला असून आता रामाच्या भेटीची आस रामभक्तांना लागली आहे.

अयोध्येतील भव्य निर्माणाधीन राम मंदिरात १६ जानेवारीला कर्म कुटीपासून पूजेस सुरूवात होईल, जिथे की तेथील कुटीत श्री रामलल्लांच्या मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर त्याच ठिकाणी त्या मूर्तीची निर्मिती करणाऱ्या कारागिराचे  ही तपस्यापूर्ती पूजन करण्यात येईल.अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी यांनी दिली

पत्रकारणाशी बोलतांना ते पुढे म्हणाले दि.  १७ जानेवारीला श्री विग्रह हे तेथील परिसरात फिरवून गर्भगृहाचे शुद्धीकरण करण्यात येईल. तसेच  १८ जानेवारीपासून अनुष्ठानास सुरूवात होईल, यात दोन्ही वेळी जल तीर्थाचे आणि सुगंध आणि गंधाचे अनुष्ठान असेल, १९ जानेवारी रोजी सकाळी फळांचे तर संध्याकाळी धान्याचे अनुष्ठान असेल. याशिवाय २० जानेवारीला सकाळी पुष्प व रत्नाचे अनुष्ठान आणि तिन्ही सांजेला तुपाचे अनुष्ठान असेल असे ही अशोक तिवारी यांनी सांगितले

२१ जानेवारीला सकाळी साखर, मिठाई आणि मधाचे अनुष्ठान आणि संध्याकाळी औषधी व विश्रांतीचे अनुष्ठान असेल. भगवान श्री राम हे सूर्यवंशी आहेत आणि आदित्य देखील द्वादश आहेत, म्हणून एकूण बारा अनुष्ठानांचे आयोजन केले आहे. याशिवाय १६ ते २२ जानेवारी दरम्यान चतुर्वेद  यज्ञांचे ही आयोजन केलं आहे. ब्रह्मेश्वर शास्त्री द्रविड, मुख्य पुरोहित श्री. लक्ष्मीकांत दीक्षित, सुनील दीक्षित, गजानंद जोगकर, अनुपम दीक्षित, घाटे गुरुजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यात ११ यजमानही असतील. २२ जानेवारीस मध्यरात्री श्री रामलल्लांच्या डोळ्यावरिल पट्टी काढून त्यांचे रुप आरश्यातून ही प्रतिबिंबित केलं जाईल. अशी माहिती अयोध्या धाम मधून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र प्राण प्रतिष्ठा सोहळा संवाद केंद्राने आमच्या प्रतिनिधींना दिली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.