आजचे राशिभविष्य शुक्रवार,२८ फेब्रुवारी २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल प्रतिपदा. वसंत ऋतू. उत्तरायण. क्रोधी नाम संवत्सर. शके १९४६, संवत २०८१.
“आज चांगला दिवस आहे.” (किंस्तृघ्न करण)
चंद्र नक्षत्र – शततारका (राहू)/ (दुपारी १.४० नंतर) पू. भा.(गुरू)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- चंद्र त्रिकोण मंगळ, केंद्र गुरू, युती शनी, लाभ हर्षल आहे. अनुकूल ग्रहमान आहे. प्रापंचिक सुख मिळेल. सगळयांचे उत्तम सहकार्य लाभेल. सखोल संशोधन कराल.

वृषभ:- मन आनंदी राहील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत कामाचा जोर वाढेल. मनासारख्या घटना घडतील.

मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे. पुण्याई मदत करेल. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील. दानधर्म कराल.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र – शनी युती आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. अनुकूल गुरू मदत करेल.

सिंह:- आत्मविश्वास वाढलेला आहे. कर्तृत्व दाखवल्यास आज यश मिळेल. भागीदारीत वादविवाद टाळा. कायदेशीर सल्ला घ्या.

कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. आरोग्य सांभाळा.

तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. आयुष्यचा अर्थ समजेल. गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे.

वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. हरवलेली वस्तू सापडेल.

धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. मौल्यवान खरेदी होईल. प्रवासाची आवड निर्माण होईल.

मकर:- संमिश्र कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. कुटुंबास वेळ द्या. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल.

कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. सखोल संशोधन करण्यास उत्तम कालावधी आहे. नवीन मार्ग सापडतील.

मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीतून लाभ होतील. दानधर्म करावा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!