आजचे राशिभविष्य,शुक्रवार,१५ मार्च २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल षष्ठी. शिशिर ऋतू,शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे.*घबाड दुपारी ४.०८ पर्यंत त्यानंतर यमघंट* 
चंद्र नक्षत्र – रोहिणी/मृग.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) योग्य कारणासाठी खर्च कराल. कुटुंब समवेत सहल घडेल. उत्साह मात्र कमी होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  अनुकूल बुधाशी चंद्राचा लाभ योग् आहे. उत्तम प्रगती होईल. वक्तृत्व चमकेल. वकिलांना यश लाभेल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. प्रवासात त्रास संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चंद्र अनुकूल आहे. मात्र अष्टम स्थानी शनी शुक्र चंद्राशी केंद्र योगात आहेत. काळजी घेणे हिताचे आहे. व्यसने टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. पत्नीचा गैरसमज होऊ शकतो.  संशयकल्लोळ टाळा. प्रेमात फसवणूक होऊ शकते.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रिय व्यक्तीसोबत सहल घडेल. लक्ष्मी प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. मात्र त्यासाठी संयम ठेवावा लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. इष्ट दैवत कोणार नाही याची काळजी घ्या. अनैतिक कामे नकोत. लॉटरी, जुगारात मोठा फटका बसेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल. घरगुती कामात वेळ जाईल. शेजारी पाजारी वादविवाद टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. आत्मविश्वास मात्र काहीसा कमी होईल. अहंकार टाळावा लागेल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लेखन कलेला बहर येईल. कलाकारांना उत्तम यश मिळेल. कुटुंबिक नाराजीचा सामना करावा लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शब्दास मान मिळेल. वक्तृत्व गाजेल. मात्र उदास वाटेल. संध्याकाळ मेजवानीची आहे. यावेळी विचारांवर ताबा ठेवा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत रवीची आगमन झाले आहे. आत्मविश्वास वाढेल.उत्साही वाटेल.नाराज शुक्र,शनी साठी श्री.हनुमान उपासना आवश्यक
आहे.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.