ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. शरद ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज क्षय तिथी” *शिवरात्री* श्री.संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव,आळंदी.भद्रा सकाळी ७.११ ते संध्याकाळी ६.५३
चंद्र नक्षत्र – विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-प्रतिकूल दिवस आहे. व्यवसायात अडचणी संभवतात. शत्रू त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद टाळा.
वृषभ:-संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ संभवते. आज मोठे निर्णय घेऊ नयेत.
मिथुन:-आर्थिक प्रगती होईल.मात्र व्यवसायात काळजी घ्या.प्रवासात त्रास संभवतो.
कर्क:-ओढाताण होऊ शकते. अचानक एखादे काम समोर येईल. शेअर्स मध्ये नुकसान.
सिंह:- गृह कलह होऊ शकतो. मोठे व्यवहार करताना जपून करा. आर्थिक नियोजन करा.
कन्या:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. गरिबांचा कळवळा येईल. मदत कराल. पुण्य फळ प्राप्त होईल.
तुळ:- क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळची व्यक्ती अचानक शत्रू होऊ शकते. कौटुंबिक गैरसमज टाळा.
वृश्चिक:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्साह वाढेल. काही सुखद क्षण अनुभवाल. गृहकलह टाळा.
धनु:- प्रतिकूल ग्रहमान आहे. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नये. आराम करणे हिताचे आहे.
मकर:- अनुकूल दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामासाठी वेळ द्यावा लागेल.
कुंभ:- स्व राशीतील शनीशी चंद्राचा केंद्र योग आहे. नोकरीत अडचणी निर्माण होऊ शकतात. पित्याची काळजी घ्या.
मीन:- शांततेने आणि संयमाने वागण्याचा कालावधी आहे. घाई गडबड नको. पाण्यापासून काळजी घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
