ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मग शुक्ल तृतीया. शिशिर ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पूर्वा भद्रपदा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कुंभ/मीन.
“आज उत्तम दिवस आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- सकाळची वेळ अनुकूल आहे. लवकर कामाला लागून महत्वाची कामे पूर्ण करा. संध्याकाळ खर्चात टाकणारी.
वृषभ:- उत्तम दिवस आहे. उदंड व्यावसायिक यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. परदेश गमन होईल.
मिथुन:– राजाधिकार मिळेल. वरिष्ठ खुश राहतील. प्रसिद्धी माध्यमातून चमक दाखवाल.
कर्क:- चंद्र शुक्राशी लाभ योग करत आहे. प्रणयरम्य दिवस आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ व्यतीत कराल. शत्रू पराभूत होतील. जल प्रवास घडेल.
सिंह:- संमिश्र दिवस आहे.सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. कनिष्ठ व्यक्तीशी सौहार्दाने वागा. आर्थिक बाजू बळकट होईल.
कन्या:- वाहन सुख लाभेल. शेअर्स मधून लाभ होतील. कार्यकुशलता वाढेल. अकल्पित धनलाभ होईल.
तुळ:- रसायने, खनिजे, औषधे यातील व्यावसायिकांना उत्तम दिवस आहे. संशोधनात प्रगती होईल. हरवलेली वस्तू सापडेल.
वृश्चिक:- धर्म कार्यात सहभी व्हा. काव्यात्मक घटना घडतील. शांतता लाभेल. महिलांना मौल्यवान भेटवस्तू मिळेल.
धनु:- अडलेली कामे पुढे सरकतील. कठोर बोलणे होईल. अन्न धान्य याची रेलचेल असेल. दागिने घडतील.
मकर:– आयुष्य सुंदर आहे, त्याचा उपभोग घ्या. चिंता दूर होतील. आयुष्याचा वेगळा अर्थ समजेल.
कुंभ:- उत्तम दिवस आहे. व्यय स्थानातील मंगळ, शुक्र खर्चात वाढ दर्शवतात. मात्र त्यांचा चंद्राशी शुभ योग आहे. नादुरुस्त वस्तू दुरुस्त करण्यास योग्य दिवस आहे.
मीन:- इच्छापूर्ती करणारा दिवस आहे. वेळ न दवडता कामास लागा. धनप्राप्ती होईल. यश मिळेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)