आजचे राशिभविष्य शनिवार,११ मे २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख शुक्ल चतुर्थी. ग्रीष्म ऋतू, 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *विनायक चतुर्थी* 
नक्षत्र: मृग/आर्द्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. खर्चात वाढ होईल. व्यसने टाळा. डोळा सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अपेक्षित लाभ होतील. खरेदी होईल. चैन कराल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अधिक कष्ट केल्यास अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दबदबा वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिकूल दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. शत्रूपिडा वाढेल. विनाकारण दोषारोप होतील. प्रवासात त्रास.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चंद्र अनुकूल आहे. मन प्रसन्न राहील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. शत्रू भय जाणवेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सौख्य लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. मनोरंजन होईल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम दिवस आहे. धनलाभ होईल. लोकप्रियता वाढेल. व्यग्र राहाल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अष्टम स्थानी चंद्र आहे. खर्च वाढणार आहेत. वाहन जपून चालवा. व्यसने टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जोडीदाराशी विनाकारण गैरसमज होतील. वाद विवाद टाळा. खर्चात वाढ होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धनलाभ करून देणारा दिवस आहे. वेळ दवडू नका. मेहनत वाढवावी लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचे नियोजन बदलावे लागेल. खर्चात वाढ संभवते. कौटुंबिक वादास सामोरे जावे लागू शकते.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. उष्णतेचे त्रास जाणवतील. चैन करण्याची उबळ येईल मात्र स्वतःवर ताबा ठेवा.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.