आजचे राशिभविष्य,रविवार,७ एप्रिल २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन कृष्ण चतुर्दशी. शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज क्षयतिथी आहे” *शिवरात्री*  
चंद्र नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ/मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीवर खर्च कराल. अचानक लाभाचे योग आहेत. नेहमीपेक्षा वेगळा विचार कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. लाभदायक दिवस आहे. संधीचे सोने करा. व्यस्त रहा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नवम स्थानी चंद्र -शुक्र युती आहे. भाग्योदय होईल. नवीन कामे हाती घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचा ताण वाढेल. मात्र त्यातून लाभ होतील. सुगंधी रसायने आणि तयार कपडे संबंधित व्यापारात यश लाभेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. परदेशी व्यापारातून यश मिळेल. जोडीदाराशी जमवून घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. अर्थलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. व्यसने टाळावीत.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  पंचमस्थानी शुक्र – चंद्र युती आहे. प्रेमात यश मिळेल. काव्य, शास्त्र यांचा आनंद घ्याल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. वाहन खरेदी होईल. मौल्यवान वस्तू मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अचानक लाभ होतील. महिलांना दागिने मिळतील. प्रवास घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) धनधान्य वाढेल. मनासारखी कामे होतील. दिवस आनंदात व्यतीत कराल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मेजवानी मिळण्याचा दिवस आहे. अधिकार वाढतील. चैन कराल. आनंदी राहाल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.