आजचे राशिभविष्य गुरूवार,७ मार्च २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ कृष्ण द्वादशी. शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज शुभ दिवस आहे” *भागवत एकादशी* 
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा/ श्रवण. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरीच्या ठिकाणी सावधानता बाळगावी लागेल. राजकीय क्षेत्रात संयम बाळगावा. स्थान बदल संभवतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वृद्धी घडेल. अनुकूल गुरू योग्य मार्ग दाखवेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीत वेळ वाया जाईल. स्वतंत्र व्यवसायाचा विचार सध्या नको.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अर्थप्राप्ती होईल. मात्र नैतिकता सांभाळा. चोरीचे भय आहे. गरजूना मदत करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संतती बाबत चिंता वाटेल. मोठी गुंतवणुक आज टाळा. पत्नीची काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) स्थावर संपत्ती बाबत काही अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक  जागेत बदल संभवतो. मित्र भेटतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. शौर्य दाखवण्याची वेळ आहे.मात्र अनैतिक कामे टाळा.नवीन विद्या शिकायला मिळतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उधारी वाढेल. आर्थिक चिंता सतावतील . जुने हिशोब काळजीपूर्वक पूर्ण करा. संततीची काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. गरम पाण्यापासून काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे.  जुनी देणी द्यावी लागतील. विनाकारण आक्षेपार्ह लेखन करू नका.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. खरेदी होईल.व्यापारात लाभ होतील.बोलताना काळजी घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.