आजचे राशिभविष्य मंगळवार,९ एप्रिल २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र शुक्ल प्रतिपदा. वसंत ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज शुभ दिवस आहे” *गुढी पाडवा, अभ्यंग स्नान* 
नक्षत्र – रेवती/अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. मेजवानीचे योग आहेत. नविन खरेदी होईल. महिलांसाठी आनंद देणारा दिवस आहे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खर्च वाढणार असला तरी तो स्वतःच्या आनंदासाठी असेल. वाहन सुख लाभेल. सकाळ अधिक अनुकूल आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. नवीन वर्षात सर्व स्वप्ने साकार होतील. लाभातील चंद्र उत्साह वाढवेल.

कर्क:(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त दिवस आहे. व्यवहार वाढतील. मन आनंदी राहील.

सिंह: (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नेहमीपेक्षा वेगळा उपक्रम राबवाल. प्रवास घडतील.

कन्या: (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामात व्यग्र व्हाल. पत्नीची मोलाची साथ लाभेल. प्रश्न सुटतील. प्रसन्न वाटेल.

वृश्चिक: (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. आर्थिक फायदा होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य सांभाळा.

धनु:(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नुकसान भरून निघेल. अचानक लाभ होतील. नवीन संधी निर्माण होतील. संतती कडून खुश खबर मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. नवीन वास्तू किंवा कार्यालयाचे स्वप्न पूर्ण होईल. गृहप्रवेश कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. कामे वाढतील. नातेवाईक भेटतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक करायचा सहभाग नोंदवा. आज कुलदेवतेचे दर्शन घ्या.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.