आजचे राशिभविष्य बुधवार,२७ डिसेंबर २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा. हेमंत ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र – आर्द्र. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मिथुन.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल चंद्र गुरू योग आर्थिक बाजू भक्कम करून देईन. मन आनंदी राहील.आत्मविश्वास वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कौटुंबिक सौख्य लाभेल. धवृद्धी होईल. येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढवणार कालावधी आहे. शत्रूंचा पराभव होईल. स्पर्धेत यश मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. संकटातून सुटका होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. दूरचे प्रवास घडतील. शिक्षणात यश.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उद्योग व्यवसायात भरभराट होईल. नवीन संधी चालून येतील. पशु लाभ होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नात्यातून लाभ होतील. दूरचे प्रवास संभवतात.लक्ष्मी प्रसन्न होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. कष्ट अधिक करावे लागतील.कौटुंबिक पातळीवर लक्ष घाला.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकस्मात लाभ होतील. शेअर्स किंवा लॉटरी मध्ये नशीब अजमावून बघण्यास हरकत नाही.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अनपेक्षित घटना घडतील. आरोग्य सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. अनुकूल रवी तुम्हाला मान सन्मान प्रदान करतील.संतती सुख लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा लागेल.कुटुंबासोबत सहल घडेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.