आजचे राशिभविष्य,बुधवार,२० मार्च २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल एकादशी.शिशिर ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे”*आमलकी एकादशी*
नक्षत्र – पुष्य/आश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरगुती कामात स्वारस्य निर्माण होईल.अडकलेली कामे मार्गी लागतील.दीर्घकालीन लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नफा वाढेल. आर्थिक लाभ होतील. कला प्रांतात चमक दाखवाल. प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. संपत्तीत वाढ होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानी मिळेल.आत्मविश्वास वाढेल.जुने प्रश्न सुटतील.आध्यात्मिक सुख लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उपसना करण्यास उत्तम दिवस आहे.सत्संग घडेल.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे.आर्थिक बाजू मजबूत होईल.स्वप्ने साकार होतील.कामे मार्गी लागतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दशम स्थानी चंद्र आहे. कामासाठी चांगला दिवस आहे.पत्नीला देखील वेळ द्याल. प्रश्न सुटतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दैवी कृपादृष्टी राहील.प्रवास घडतील.जुने मित्र भेटतील.येणी वसूल होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे.मोठे धाडस नको.नेहमीची कामे चालू ठेवा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढवणारा दिवस आहे.सहकार्य लाभेल.प्रिय व्यक्तीची भेट होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक बाबतीत उत्तम दिवस आहे.कामे पूर्ण होतील.आरोग्य मात्र सांभाळा.जुनाट व्याधी डोके वर काढतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आनंद देणारा कालावधी आहे.कोण स्थानातील चंद्र कामाला गती देईल.विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.