आजचे राशिभविष्य शुक्रवार २५ ऑक्टोबर २०२४ 

0

आज शुभ दिवस अश्विन कृ ९
राहुकाळ –  सकाळी १० .५३ ते दुपारी १२.१८
नक्षत्र: पुष्प 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरीत अधिकार गाजवण्याची वेळ येईल. कठोर भूमिका घ्याल. भ्रमित होऊ नका. साकल्याने विचार करा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रिय देवतेची अनुभूती मिळेल. प्रवासात त्रास संभवतो. उच्च शिक्षणात यश मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) काळजी घेण्याचा दिवस आहे. व्यापारात वृद्धी होईल. मात्र अति धावपळ टाळा. वाहन जपून चालवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मत्सर त्रास जाणवेल. शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात दिरंगाई होईल. विवाद टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्या चुकांचे दोषारोपण इतरांवर नको. काळजी घ्या. चोरीचे भय आहे. जातीय भेद टाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मुलाचे प्रदेश गमन घडेल. अकल्पित लाभ होतील. शेअर्स मध्ये मोठी जोखीम घेऊ नका. वाहन जपून चालवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जमीन व्यवहारात अधिक बारकाईने लक्ष घालावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. रसायने हाताळताना त्रास संभवतो.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  भावंडांशी गाठ भेट होईल. त्यांची मदत मिळेल. वादविवाद टाळा. आरोग्य सांभाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बोलण्यातून विनाकारण गैरसमज होऊ शकतात. अचानक एखादा खर्च सामोरा येऊ शकतो. घशाची काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विपरीत अनुभव येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आजही फारशी अनुकूलता नाही. व्यक्त होताना सावधानता बाळगा. चोरीचे भय आहे. आगी पासून सावध रहा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अधिकार वाढतील. येणी वसूल होतील. जुने संबंध प्रस्थापित होतील.जीवनाला आकार येईल.

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.