आजचे राशिभविष्य शुक्रवार,२३ ऑगस्ट २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण कृष्ण चतुर्थी/पंचमी. क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे.
चंद्रनक्षत्र – रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/ (संध्याकाळी ७.५४ नंतर) मेष.

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. सुरुवात संथ होणार आहे. नवीन खरेदी होईल. चैनीसाठी खर्च कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येईल. दबदबा वाढेल. अधिकारात बदल होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाचा धडाका वाढेल. उसंत मिळणार नाही. भविष्याचा उत्तम वेध घ्याल. नवीन संकल्प कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रवास करते लागतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. आयात – निर्यात यातून लाभ होतील. आशीर्वाद मिळतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सावकाश वाटचाल करा. मोठी जोखीम नको. उत्तरार्धात आर्थिक प्रगती जोमाने होणार आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करून घ्या. कुलदेवतेचे दर्शन घ्याल. उत्तम अनुभव येतील. मन पवित्र आनंदाने भारून जाईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. प्रगतीचा वेग वाढेल. एखादे संकट टळेल. मात्र काळजीपूर्वक पावले टाका. नोकरीत भ्रमंती करावी लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. हरवलेल्या वस्तू सापडतील. दूरचा प्रवास घडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक दृष्टीने चांगला कालावधी आहे. समाधानकारक घटना घडतील. प्रगती होईल. पशु लाभ होईल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम ग्रहमान आहे. त्याचा आज आनंद घ्या. आवडत्या ठिकाणी जाणे घडेल. दबदबा वाढेल. प्रसन्न वाटेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) ठीकठाक दिवस आहे. सरासरी प्रमाणे लाभ होतील. वक्तृत्व बहरेल. सामाजीक वजन वाढेल. घरगुती कामे पूर्ण होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम ग्रहमान आहे.भावंडांचे सहकार्य लाभेल.लेखक/प्रकाशक याना लाभ होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. छोटे प्रवास होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.