आजचे राशिभविष्य शुक्रवार,१५ डिसेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल तृतीया. हेमंत ऋतू, दक्षिणायन, शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) जुने मित्र भेटतील. मौज कराल. चैनीवर खर्च कराल. मेजवानीचे योग आहेत.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पूर्वार्ध संथ आहे. खर्चात वाढ संभवते. प्रशासकीय कामात दिरंगाई नको.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. कामाचा वेग वाढवावा लागेल. उत्तरार्ध विश्रांतीचा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. जल पर्यटन घडेल. छोटी सहलीचे योग आहेत. भाग्योदय होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अचानक लाभ होतील. जुनी गुंतवणूक कामी येईल. पाण्यापासून काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पाळीव पशूंपासून लाभ होतील. आनंदाची बातमी येईन. उत्तरार्ध धाडसी स्वभाव दर्शवणारा आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आनंददायक ग्रहमान आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अर्थकारण मजबूत होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तरार्ध उत्तम आहे. आर्थिक आवक वाढेल. कुलदेवतेचे दर्शन घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रगतीचा वेग वाढेल. उत्साह वाढवणारा कालावधी आहे. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात संथ होणार आहे. हळूहळू कामाचा वेग वाढेल. संध्याकाळी मेजवानी मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्धात कामे पूर्ण करा. खर्चात वाढ संभवते. आरोग्याची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम ग्रहमान आहे. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल. काही संभ्रम निर्माण होतील. त्यासाठी योग्य सल्ला घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!