ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी. शिशिर ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्र नक्षत्र – विशाखा/(रात्री ८.२९ नंतर) अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/ (दुपारी १.५७ नंतर) वृश्चिक.
“आज वर्ज्य दिवस आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- सप्तम चंद्राचा शुक्राशी केंद्र योग तर हर्षलशी प्रतियुती आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे करून घ्या. शत्रू त्रास जाणवेल. व्यापार वाढेल.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. विनाकारण वाद होऊ शकतात.
कर्क:- घरगुती काम करताना काळजी घ्या. बोलताना काळजी घ्या. विंचू काट्याचे भय आहे.
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नातेवाईकांमुळे लाभ होईल. नोकरीत त्रास होऊ शकतो.
कन्या:- कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.
तुळ:- तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. वक्तृत्व चमकेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी अनुकूल नाही. दुपारनंतर फरक पडेल. भागीदारी व्यवसायात वाद होऊ शकतात.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. सुरुवातीला चांगले अनुभव येतील. संध्याकाळ नंतर काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल.
मकर:– दशम आणि लाभ स्थानी चंद्र आहे. चांगले योग आहेत परंतु नोकरीत त्रास होऊ शकतो. शेअर्स मध्ये जपून निर्णय घ्या.
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा सला मोलाचा ठरेल. नात्यात वाद होऊ शकतात.
मीन:- संमिश्र दिवस आहे. सुरुवातीला फारशी अनुकूलता नाही. अति धाडस नको. दानधर्म करा. देणी द्यावी लागतील.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
