आजचे राशिभविष्य शुक्रवार,७ फेब्रुवारी २०२५

७ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ शुक्ल दशमी. शिशिर ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.   
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
चंद्र नक्षत्र – रोहिणी/ (संध्याकाळी ६.४० नंतर) मृग.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  वृषभ.
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 

मेष:-  चंद्र त्रिकोण रवी, चंद्र त्रिकोण बुध, चंद्र युती गुरू. चंद्र केंद्र शनी. रवी ष मंगळ आहे. सरकारी कामे मार्गी लागतील. वरिष्ठ खुश होतील. संपत्ती वाढेल.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. नोकरीत चांगले अनुभव येतील. मेजवानी मिळेल.

मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म कराल. खर्च वाढतील.

कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील. मन प्रसन्न राहील.

सिंह:- आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. वक्तृत्व चमकेल. नवीन खरेदी होईल. नोकरीत संमिश्र अनुभव येतील.

कन्या:- प्रवास घडतील. कामांना गती प्राप्त होईल. पूर्वजांची पुण्याई अनुभवास येईल. आरोग्य सांभाळावे लागेल.

तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. आध्यात्मिक लाभ होतील. दानधर्म कराल. सामाजिक कार्यातून नावलौकिक वाढेल.

वृश्चिक:- व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. योग्य सल्ला मिळेल.

धनु:-  संमिश्र ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक भरभराट होईल. साधन संपत्ती वाढेल.

मकर:–  व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. संततीकडून चांगली बातमी समजेल. व्यावसायिक प्रगती होईल. राजकीय यश मिळेल.

कुंभ:- तुमच्या राशीतील शनीशी चंद्राचा केंद्र योग आहे. सांभाळून पावले टाका. घरगुती कामे आज पूर्ण होतील. व्यवसायाचे नियोजन काटेकोरपणे करा.

मीन:- हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. प्रवास घडतील. वाहन सौख्य लाभेल.

७ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर नेपच्यून ग्रहाचा प्रभाव असल्याने छान छान रहाणे, सतत आनंदी असणे, स्वप्नात आणि प्रेमात दंग होणे तुम्हाला आवडते. तुम्हाला मोकळ्या आकाशात स्वैर विहार करावासा वाटतो. परंपरांबद्दल तुम्हाला फारशी आत्मीयता नाही. नवनवीन संशोधन केलेल्या वस्तूंची तुम्हाला आवड असते. तुम्ही उच्च दर्जाच्या लोकांमध्ये राहतात. सर्वसाधारण लोकांमध्ये राहणे तुम्हाला आवडत नाही. चांगला पैसा मिळविण्याची कला तुम्हाला अवगत असते. अनेकदा तुम्ही बेफिकीर असतात आणि एखादे व्यसन करावे असे तुम्हाला वाटू शकते. आयुष्यात तुम्हाला सतत बदल पाहिजे असतात. तुम्ही अत्यंत खंबीर असतात. तुमचा इतरांना आधार वाटतो. प्रेमात मात्र तुम्ही संशय घेतात. कोणतेही काम हाती घेताना त्याचे परिणाम काय होतील याचा तुम्ही बारकाईने विचार करतात. तुमची वृत्ती बंडखोर आहे.

व्यवसाय:- आयात – निर्यात, दुग्ध , मत्स्य व्यवसाय, वैद्यकीय क्षेत्र, संगणक क्षेत्र.
आरोग्य :- मनावरील ताणतणाव, रक्ताभिसरण, पोटच्या तक्रारी यांपासून कळजी घ्या.
शुभ दिवस: सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग: हिरवा, पिवळा, जांभळा.
शुभ रत्ने: पुष्कराज, हिरा, लसण्या.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.