आजचे राशिभविष्य शुक्रवार,१२ जानेवारी २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल प्रतिपदा. हेमंत ऋतू, शोभन नाम संवत्सर
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरी/व्यवसायात कसोटीचा दिवस आहे. तुमची बाजू बरोबर असली तरी माघार घ्यावी लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सुखद घटना घडतील. मात्र प्रवासात खर्च वाढतील. अचानक एखादे संकट समोर येऊ शकते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. शासकीय सन्मान मिळतील. मन स्वास्थ्य उत्तम राहील. महिलांकडून लाभ संभवतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्या यशामध्ये जोडीदाराचे बहुमोल योगदान असणार आहे. सहकाऱ्यांचा योग्य आदर करा. नोकरीत काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अर्थकारण सुधारेल. प्रगती होईल. मात्र अनैतिक मार्गाने जाणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सृजनाची आवड असण्याऱ्याना सुखद अनुभव येतील. नवीन कल्पना राबवाल. श्री दत्त गुरूंची उपासना करा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घर गृहस्थीसाठी वेळ द्यावा लागेल. पत्नीची काळजी घ्या. वाहन दुरुस्ती करावी लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. वक्तृत्व चमकेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शब्दभांडार कामी येईल. संवाद कला बहरेल. मिष्टान्न मिळतील. खर्च वाढला तरी दुःख होणार नाही.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चतुर्थातील गुरुशी चंद्राचा केंद्र योग आहे. गृहकलह टाळा. वाहन जपून चालवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल मंगळ पाठीशी ठामपणे उभा राहील. प्रगतिशील वाटचाल कराल. खर्चात वाढ होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंब सुख लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.