आजचे राशिभविष्य शुक्रवार,१२ जुलै २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक १२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल षष्ठी/सप्तमी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम चांगला दिवस आहे. *घबाड दुपारी १२.३३ पर्यंत* 
चंद्र नक्षत्र – उत्तरा फाल्गुना.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. आज काम पूर्ण करा. कलाकारांना यश मिळेल. घरात मोठे बदल घडतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. नवीन ओळखीतून फायदा होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन खरेदी होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रणयरम्य दिवस आहे. मन आनंदी राहील. चांगली बातमी समजेल. आर्थिक बाजू मजबूत होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. चैनीवर खर्च कराल. प्रगतीची घोडदौड चालू राहील. सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. आर्थिक भरभराट होईल. येणी वसूल होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. स्त्रीधन वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  चंद्र अनुकूल आहे. धाडसी निर्णय घ्याल. प्रवासातून लाभ होतील. वाह सौख्य लाभेल. अहंकार टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीतील सहकाऱ्यांसाठी खर्च कराल. काही छोटे बदल संभवतात. शुभ कार्य ठरेल. अर्थलाभ होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. आर्थिक प्रगतीची घोडदौड चालू राहील. संतती कडून चांगली बातमी येईन.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. आर्थिक लाभ होतील. शत्रूचा त्रास जाणवेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रिय पत्नीची उत्तम साथसंगत लाभेल. लेखकांना उत्तम यश मिळेल. प्रेमात चांगली बातमी समजेल. खरेदी होईल.

१२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला जीवनात अधिकार व मान मिळतो. पैसा कसा मिळवावा याचे तुम्हाला कला अवगत असते. आयुष्यात तुम्हाला सतत बदल आवडतो. तुम्ही शंकेखोर असतात. मनाने तुम्ही मोकळे असतात आणि तुमच्या कृतीमध्ये एक मुक्तपणा असतो. बालपणापासून तुम्ही आनंदी आणि उत्साही आहात मात्र तुमच्या भावनांना तुम्ही आवर घातला पाहिजे. तुमच्या वागणुकीतून इतरांना स्फूर्ती मिळते.

आपल्या स्वतःच्या घराबद्दल आणि देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास आणि इतर देशांचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचे ज्ञान वाढवतात. जीवनाकडे तुम्ही एका उच्च पातळीवरून बघतात. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. संशोधन करण्यात तुम्हाला अधिक रस असतो. एकाच वेळी तुम्ही दोलायमान मनस्थितीमध्ये असतात. खंबीरपणा आणि भित्रेपणा अनुभवतात. तुमच्या विचारात आणि वागण्यात स्वतंत्र पण आहे. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना स्वतंत्र असतात. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात.

तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुम्ही कायदा प्रेमी आहात. बालपणापासूनच खेळ आणि इतर कलांमध्ये तुम्ही सहभागी होतात. तुमचा जनसंपर्क मोठा असतो. अनेक लोकांचे तुम्ही कल्याण करतात. दुसऱ्याने केलेले टीका तुम्ही फार मनाला लावून घेतात.

व्यवसाय:-  आयात -निर्यात, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, वैद्यकीय क्षेत्र, सरकारी अधिकारी, शिक्षण क्षेत्र, जाहिरात, अभिनय.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा, अंजीरी.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथिस्ट, लसण्या. (रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.