आजचे राशिभविष्य शुक्रवार,५ जुलै २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 
अमावस्या. क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे. *दर्श अमावस्या*  
चंद्र नक्षत्र – आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मंगल – शनी लाभ योग आहे. अनुकूल शनी भरभरून यश देईन. काहीसा कठोर दिवस आहे. बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वागण्यात आणि स्वभावात बदल करावा लागेल. मेजवानी मिळेल. संध्याकाळ कौटुंबिक आनंदाची.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साही दिवस आहे. क्रीडा क्षेत्र गाजवाल. प्रवास घडतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिकूल दिवस आहे.  कोर्ट कामात अपयश येईल. स्पर्धेत मागे पडू शकतात. महत्वाची कामे आज नकोत.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सरकारी नोकरीत उत्तम यश मिळेल. मनासारखी कामे होतील. मात्र संयम बाळगावा लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नोकरीत चांगले अनुभव येतील. मान सन्मान मिळेल. हरवलेली वस्तू सापडेल. वाहन जपून चालवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन संधी चालून येतील. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. शत्रू पराभूत होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी रवी चंद्र युती आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. भलते धाडस करू नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. पत्नीची भक्कम साथ लाभेल. छोटे प्रवास घडतील. लेखकांना यश मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक गणित जमून येईल. मात्र अति धाडस करू नये. मोठी गुंतवणूक टाळा. योग्य सल्ला घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) भावंडांची मोठी मदत मिळेल. जुनाट वाद मिटतील. संततीची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) राजकीय क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आज खर्च वाढला तरी वाया जाणार नाही.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. -ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.