ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ कृष्ण त्रयोदशी. शिशिर ऋतू,शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे. *प्रदोष, महशिवरात्री*
चंद्र नक्षत्र – श्रवण/धनिष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरीत अधिकार गाजवण्याची वेळ येईल. कठोर भूमिका घ्याल. भ्रमित होऊ नका. साकल्याने विचार करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रिय देवतेची अनुभूती मिळेल. प्रवासात त्रास संभवतो. उच्च शिक्षणात यश मिळेल.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) काळजी घेण्याचा दिवस आहे. व्यापारात वृद्धी होईल. मात्र अति धावपळ टाळा. वाहन जपून चालवा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मत्सर त्रास जाणवेल. शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात दिरंगाई होईल. विवाद टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्या चुकांचे दोषारोपण इतरांवर नको. काळजी घ्या. चोरीचे भय आहे. जातीय भेद टाळा.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मुलाचे प्रदेश गमन घडेल. अकल्पित लाभ होतील. शेअर्स मध्ये मोठी जोखीम घेऊ नका. वाहन जपून चालवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जमीन व्यवहारात अधिक बारकाईने लक्ष घालावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. रसायने हाताळताना त्रास संभवतो.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भावंडांशी गाठ भेट होईल. त्यांची मदत मिळेल. वादविवाद टाळा. आरोग्य सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बोलण्यातून विनाकारण गैरसमज होऊ शकतात. अचानक एखादा खर्च सामोरा येऊ शकतो. घशाची काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विपरीत अनुभव येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आजही फारशी अनुकूलता नाही. व्यक्त होताना सावधानता बाळगा. चोरीचे भय आहे. आगी पासून सावध रहा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अधिकार वाढतील. येणी वसूल होतील. जुने संबंध प्रस्थापित होतील.जीवनाला आकार येईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)