आजचे राशिभविष्य शुक्रवार,१७ मे २०२४

१७ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक 
वैशाख शुक्ल नवमी/दशमी. ग्रीष्म ऋतू, क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज चांगला दिवस आहे.  
चंद्र नक्षत्र – पूर्वा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चांगली बातमी मिळेल. अचानक लाभ होतील. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करवा लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल चंद्र – हर्षल योग अचानक लाभ करून देईल. कामाचा ताण मात्र वाढेल. नोकरी आणि संसार यात ओढाताण होऊ शकते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल हर्षल तुम्हाला नशीबवान आणि पराक्रमी बनवेल. आनंदी राहाल. प्रवासात काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र  दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. कौटुंबिक वाद उदभवू शकतात. हनुमान उपासना करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उच्च शिक्षणात यश मिळेल. अचानक लाभ होतील. नवीन संधी चालून येतील. जोडीदार नाराज होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अद्यापही फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवावा लागेल. आरोग्याच्या कुरबुरी चालू राहतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  प्रतिष्ठा वाढेल. नुकसानीचे नेमके कारण समजेल. नोकरीच्या ठिकाणी किरकोळ वाद संभवतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धर्म कार्य कराल. त्यात उत्तम यश लाभेल. नावलौकिक वाढेल. करार करताना काळजी पूर्वक करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अजूनही फारशी अनुकूलता नाही. एखादी अप्रिय बातमी समजू शकते. नात्यात वाद टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र असून शनिशी प्रतियोग आहे.स्पर्धेत पराभव पत्करावा लागेल. मात्र अहंकार वाढेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दुसरा हर्षल, बारावा शनी यत्न जपून राहण्याचा संदेश मिळतो. खर्च वाढतील. विनाकारण मोठेपणा मिरवू नका.

१७ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनि, बुध आणि शुक्र ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत विचारी, महत्वाकांक्षी आहात. संघटन करणे तुम्हाला चांगले जमते. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. तुमचा विरक्तीकडे कल असतो. जीवनात बऱ्याच वेळेला अति कष्टाने यश साध्य होते. छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळे येतात. तुमचे विचार क्रियाशील असतात. तुम्ही विधायक कामे करतात. तुम्ही शांतताप्रिय आहात.

सामाजिक कामाची तुम्हाला आवड आहे. गूढ विद्यांबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. तुम्ही संशोधक आणि धाडसी वृत्तीचे असून तुम्ही स्वाभिमानी आहात. स्वतःच्या कल्पनेतून तुम्हाला यश मिळते. तुम्ही भित्रेपणा टाळला पाहिजे. तुमच्यात अभ्यासाची खोली, शिस्त, गांभीर्य आणि कर्तव्याची जाणीव आहे. तुम्ही स्थिर वृत्तीचे आहात.

कोणत्याही घटनेचा समतोल विचार करण्याची तुमची वृत्ती आहे. अनेकदा तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक धोरणीपणे निर्णय घेतात. तुम्ही कार्यमग्न असतात मात्र बुद्धिमत्ता वापरून कार्य करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल सहानुभूती वाटते. तुमचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आणि प्रसन्न आहे.कोणत्याही गोष्टीचा तुम्ही उत्तम पणे नियोजन करू शकतात. तुम्ही न्यायप्रिय आणि कायदा प्रेमी आहात. तुमचे आर्थिक नियोजन उत्तम असते. कठीण काळाचे नियोजन कसे करावे हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती असते.

व्यवसाय:- गणित, भौतिक, रसायन, वैद्यकीय, शास्त्र, संशोधन, प्रयोगशाळा, बँकिंग, वकिली.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रत्ने:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
शुभ रंग:- राखाडी, गडद निळा, काळा, जांभळा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.