आजचे राशिभविष्य शुक्रवार,शनिवार,२३ डिसेंबर २०२३

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० 
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी/द्वादशी. हेमंत ऋतू, उत्तरायण.   
“क्षय तिथी आहे.” *भागवत एकादशी*
नक्षत्र: भरणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनप्राप्ती होणार आहे. व्यवसायात काही मोठे बदल संभवतात. कायदेशीर सल्ला घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) प्रतिकूल दिवस आहे. अचानक एखादा खर्च उभा राहू शकतो. वाहन जपून चालवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभदायक दिवस आहे. अनेक दिवस ज्याची वाट बघत होतात ते घडेल. विस्तव पासून काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ खुश होतील. नोकरीत बदल घडतील. मन रमेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गुंतवणुकीतून लाभ होतील. जेष्ठ व्यक्तीची सेवा घडेल. उच्च शिक्षणात यश लाभेल.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रतिकूल दिवस आहे. अप्रिय घटना घडू शकते. घरातील जेष्ठांची काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चोरीचे भय आहे. सहकाऱ्याशी जमवून घ्यावे लागेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसाय वृद्धी होईल. षष्ठ स्थानात चंद्र – हर्षल युती आहे. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील मात्र गुंतवणुकीची काळजी घ्या. संतती चे प्रश्न समजून घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सामाजिक वाद उदभवू शकतात. तुमच्या वरिष्ठ नेत्यावर विश्वास ठेवू नका. फसवणूक होऊ शकते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. उजव्या हाताची काळजी घ्या. लेखकाना यश लाभेल. महत्वाची कागदपत्रे गहाळ होऊ शकतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) स्थावर संपत्ती बाबत काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. दागिने सांभाळा. डोळ्यांची काळजी घ्या.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!