आजचे राशिभविष्य शुक्रवार,२० सप्टेंबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण तृतीया. शरद ऋतू,क्रोधीनाम संवत्सर.    
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे.  
चंद्र नक्षत्र – अश्विनी.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. (विष्टी करण शांती)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र – मंगळ लाभ योग आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. कठोर भूमिका घ्याल. न्याय कराल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यय स्थानी चंद्र आहे. शुक्राशी प्रतियुती आहे. प्रेमात फसवणूक होऊ शकते. विनाकारण वाद वाढतील. अति धाडस नको.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचे सान्निध्य लाभेल. अहंकार टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. अपेक्षे इतकी नसली तरी नोकरीत पुरेशी प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. हाताची काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. एखादी चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. यशाची शिखरे गाठाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. अनुकूलता वाढेल. जेष्ठ व्यक्तींबाबत चांगली बातमी समजेल. घरगुती समस्या सुटतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. वारसा हक्काचे प्रश्न निर्माण होतील. प्रशासकीय कामे मार्गी लागतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. शेअर्स मधून लाभ होतील. कोर्टात यश मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. कामाची गती मात्र काहीशी संथ असेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल. स्त्री धन वाढेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. नियोजनात बदल होईल. कला क्षेत्रातून लाभ होतील. महिलांकडून सहकार्य लाभेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.