आजचे राशिभविष्य रविवार, १६ जून २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल दशमी. क्रोधीनाम संवत्सर.    
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – हस्त. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नवीन क्षेत्र खुणावेल. संधी चालून येतील. संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) परदेश गमन घडेल. प्रज्ञा शक्ती चा प्रत्यय येईल. काव्यनिर्मिती होईल. उपासना दैवत प्रसन्न राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) एकत्र कुटुंबात उत्तम अनुभव येतील. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल. भाडेकरूचा उपद्रव जाणवू शकतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. भेदभाव मिटतील. बौद्धिक प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुरुवात चांगली होणार आहे. संमिश्र दिवस आहे. आर्थिक चिंता काहीशी कमी होईल. काटकसर कराल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मनाची स्थिरता वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल दिवस आहे. एखादी आपत्ती येऊ शकते. किंवा विनाकारण दंड होऊ शकतो. वादविवाद टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  अनुकूल दिवस आहे. सर्व प्रकारचे लाभ होतील. शेजारी मदत करतील. नात्यातून चंगले अनुभव येतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  पर्जन्यमान चांगले झाल्याने तुम्ही सुखावून जाल. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अधिकार प्राप्त होतील. कीर्ती पसरेल. राजकृपेचा अनुभव घ्याल. प्रवास घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अजूनही अनुकूलता नाही. वादविवाद होऊ शकतात. अपेक्षाभंगाचे दुःख पदरी पडू शकते. नदी, पाणी या जवळ काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमित करणारा दिवस आहे. चुकीचे निर्णय होऊ शकतात. जवळच्या व्यक्त दुखावल्या जाऊ शकतात. स्पर्धेचा त्रास जाणवेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. -ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.