आजचे राशिभविष्य गुरूवार,११ एप्रिल २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र चुकलं तृतीया. वसंत ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *गौरी तृतीया* 
चंद्र नक्षत्र – कृतिका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सत्तेपुढे शहाणपण व्यर्थ असते याचा आज प्रत्यय येईल. विनाकारण खर्च होऊ शकतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. अडचणीतून काहीशी सूट मिळेल. बौद्धिक क्षेत्र गाजवाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. खर्च वाढतील. कामाचा ताण अधिक असणार आहे. व्यवसायात लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. अनुकूल चंद्र उत्साह वाढवेल. प्रवास घडतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामात लक्ष लागेल. नवीन विषयांची गोडी निर्माण होईल. तंत्र आत्मसात कराल. जेष्ठ व्यक्तीची सेवा कराल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. जेष्ठांचे आशीर्वाद लाभतील. शत्रू पराभूत होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. व्यवसाय वाढेल मात्र नीतिमत्ता सोडू नका. प्रलोभने येतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सप्तम स्थानी चंद्र आहे. उत्तम सहकार्य मिळेल. उत्साह वाढेल. खुशखबर मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. घरगुती कटकटिना सामोरे जावे लागू शकते. वाहन दुरुस्ती संभवते.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आनंद देणारा दिवस आहे. कामाचा पसारा वाढेल. व्यावसायिक यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. वक्तृत्व कामास येईल. कायद्याने वागणे हिताचे आहे. घरगुती कामात वेळ जाईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत रवी – बुध युती आहे. व्यावसायिक यश लाभेल. कणखरपणे निर्णय घ्याल. कष्ट कराल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!