ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र कृष्ण पंचमी/षष्ठी. ग्रीष्म ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पूर्वाषाढ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
“आज चांगला दिवस आहे.” *श्री चंद्रला देवीचा उत्सव*
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- अनुकूल शनीचा चंद्राशी शुभ योग आहे. आध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. अधिकाराचा दुरुपयोग टाळा.
वृषभ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. नोकरीत सुखद अनुभव येतील. नवीन ओळखी होतील. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
मिथुन:- नोकरीत काहीशा कटकटी होऊ शकतात. कामाचं ठिकाणी एकाग्रता आवश्यक आहे. भिन्न लिगी व्यक्तीकडे ओढा वाढेल मात्र धर्माने वागा.
कर्क:- धनलाभ होईल. मात्र मन शांत ठेवणे अवश्यक आहे. ध्यानधारणा करा. प्रवासात काळजी घ्या.
सिंह:- कामाचे नियोजन बदलेल. मानसिक त्रास जाणवेल. विनाकारण मनाची गुंतवणूक करू नका. शत्रूचा त्रास वाढेल.
कन्या:- फारशी अनुकूलता नाही. कामाचा ताण वाढेल. आर्थिक लाभ चांगले होतील. मात्र खर्च देखील वाढतील.
तुळ:- सौख्य लाभेल. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. धनलाभ होईल. मात्र चुकीचे वागल्यास मोठी शिक्षा मिळू शकते.
वृश्चिक:- खर्चात वाढ होणार आहे. मात्र मानसिक सौख्य लाभेल. पुढील खर्चाचे नियोजन कराल.
धनु:- अनुकूल दिवस आहे. स्वप्न साकार होतील. मन प्रसन्न राहील. शेतातील कामे मार्गी लागतील.
मकर:- धनक्षय होईल. खर्च वाढतील. मात्र आर्थिक आवक वाढल्याने नियोजन होऊ शकेल. स्पर्धेचा त्रास जाणवेल.
कुंभ:- अनुकूल चंद्र आहे. पैसे येतील तसेच जातील. खर्च वाढू शकतात. आध्यात्मिक लाभ होतील.
मीन:- स्वतःवर काही बंधने आल्याचे जाणवेल. मर्यादा ओळखाव्या लागतील. मात्र मनाचा उत्साह जराही कमी होणार नाही.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
