ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन अमावस्या. शिशिर ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज वर्ज्य दिवस आहे.” *दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या*
चंद्र नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा/रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- व्यय स्थानातील अमावस्या आहे. मोठे निर्णय आज घेऊ नका. खर्च वाढतील. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. स्वप्न साकार होतील. सरकारी कामे होतील. मित्र मंडळी भेटतील.
मिथुन:- नोकरीत बदल संभवतात. कनिष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागेल.
कर्क:- मोठ्या घडामोडी नकोत. दूरचे प्रवास संभवतात. अचानक एखादे काम अंगावर येईल.
सिंह:- प्रतिकूल दिवस आहे. अष्टम स्थानातील रवी -चंद्र युती तणाव वाढवेल. वाहन जपून चालवा.
कन्या:- कामाचा उरक वाढेल. जनशक्ती पाठीशी उभी राहील. नवीन सुरुवात नको. पत्नीची काळजी घ्या.
तुळ:- आर्थिक प्राप्ती होईल. व्यवसाय वाढेल. मोठी उलाढाल अपेक्षित नाही. वेळेचा सदुपयोग करा.
वृश्चिक:- शेअर्स मध्ये थोडेफार लाभ मिळवून देणारा दिवस आहे. जेष्ठ अपत्याची काळजी वाटेल. बुद्धिभ्रम होऊ शकतो.
धनु:- घरात काही बदल घडतील. व्यवसाय वाढेल. सामाजिक कार्यात उदासी अनुभवास येईल.
मकर:- इतरांना प्रेरणा द्याल. वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल. आयुष्याला वळण देणारा कालावधी आहे.
कुंभ:– विक्री व्यवसायात लाभ होतील. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा. उधारी नको.
मीन:- तुमच्या राशीत चंद्र रवी युती आहे. आत्मविश्वास वाढेल. अडथळे दूर होतील. सूर्य उपासना करा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
