ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण शुक्ल सप्तमी/अष्टमी. वर्षा ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – स्वाती/विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
“आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे.”*श्रावणी सोमवार* शिवामूठ ‘तीळ’.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- चंद्राचा शनीशी शुभयोग आहे. अत्यंत उच्च दर्जाचे आध्यात्मिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीची संगत लाभेल. सामाजिक कार्यातून अप्रिय अनुभव येऊ शकतील. शेजाऱ्यांशी वाद संभवतात.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. नोकरीत मनासारखी बढती/बदली होईल. प्रगती करणारे ग्रहमान आहे. भावंडांशी मतभेद सांभावतात.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. उच्च शिक्षणात यश लाभेल. खर्च वाढेल.
कर्क:- जीवनाचा आनंद घ्याल. आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. घरगुती काम करताना काळजी घ्या. बाग – बगीचा मध्ये जपून वावरा.
सिंह:- अर्थकारण सावरले. येणी वसूल होतील. जोडीदारामुळे भाग्योदय होईल. स्पर्धेत यश मिळेल. सरकारी कामे रेंगाळतील.
कन्या:- आयुष्याला नवे आयाम मिळतील. कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. राजकीय यश मिळेल. नेतृत्व कराल.
तुळ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. पंचमातील शनीशी शुभ योग आहे. जबरदस्त यश मिळेल. हाती घ्याल ते काम तडीस न्याल. आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायाचे नियोजन बदलेल. कनिष्ठकडून उत्तम सहकार्य मिळेल. खर्च वाढतील. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च कराल.
धनु:- अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळी आणि नात्यातून सहकार्य मिळेल. भरघोस पोरगी साध्य कराल. नैराश्य दूर होईल. छंद जोपासले जातील. मैफिलीत भाग घ्याल.
मकर:– दशम स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. उत्तम प्रगती होईल. नवीन काही शिकण्यास मिळेल. प्रिय व्यक्तीची काळजी घ्या
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. त्रिकोण योग शुभ फलदायी आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. सत्संग लाभेल. उपासना फळास येईल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन:- संमिश्र दिवस आहे. अजूनही फारशी अनुकूलता नाही. दानधर्म करा. देणी द्यावी लागतील. गुंतवणूक काळजीपूर्वक करा. सावधपणे वाटचाल करा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
