आजचे राशिभविष्य सोमवार,५ ऑगस्ट २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 
श्रावण शुक्ल प्रतिपदा. वर्षा ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – अश्लेषा/मघा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क/ (दुपारी ३.२२ नंतर) सिंह.
“आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे.” *श्रावणी सोमवार* शिवामूठ ‘तांदूळ’. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- चंद्राचा हर्षलशी केंद्रयोग आहे तर शुक्राशी युती आहे. संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. सामाजिक कामातून निराश होऊ शकते. शब्द देताना काळजी घ्या.

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय मित्र मंडळी भेटतील. नातेवाईकांचे येणे -जाणे राहील. घरगुती वाद होऊ शकतात.

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. खर्च वाढेल. सार्वजनिक लेखन करताना काळजी घ्या.

कर्क:- आत्मविश्वास वाढेल. प्रणय रम्य दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. आध्यात्मिक उन्नती होईल. दानधर्म कराल. गायकांना यश मिळेल.

सिंह:- दिवसाची सुरुवात फारशी चांगली नसली तरी नंतर परिस्थिती बदलेल. मन आनंदी राहील. नोकरीत काही कटकटी उदभवू शकतात.

कन्या:- अनुकूल सुरुवात आहे. अर्थकारण मजबूत होणार आहे. चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल. उत्तरार्ध खर्च वाढवणारा आहे.

तुळ:- अनुकूल दिवस आहे. नवनवीन योजना आखून त्या पार पाडाल. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.

वृश्चिक:- प्रवासाचे नियोजन बदलेल. महिलांकडून उत्तम सहकार्य मिळेल. चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. मेजवानी मिळेल.

धनु:-  सुरुवातीला फारशी अनुकूलता नाही. महत्वाची कामे आज सकाळी नकोत. दुपार नंतर अनुकूलता वाढेल. कामाला वेग येईल. आरोग्य जपा.

मकर:- संमिश्र दिवस आहे. अचानक खर्चास सामोरे जावे लागेल.मन अस्वथ राहील, शेअर्स मध्ये अजिबात जोखीम घेऊ नका. आर्थिक नियोजन जपून करा. खरेदी होईल.

कुंभ:- पंचम आणि षष्ठ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. चांगली बातमी समजेल. घरगुती वाद टाळावे लागतील.

मीन:- अनुकूल दिवस आहे. घसघशीत आर्थिक लाभ होतील. कलाकारांना उत्तम यश लाभेल. लेखक/प्रकाशक यांना मात्र अडचणींना सामोरे जावे लागेल.
 
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.