ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण दशमी. हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
“आज वर्ज्य दिवस आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- संमिश्र दिवस आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. सासुरवाडीचे काम करते लागेल.
वृषभ:– सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱयांना चांगली बातमी मिळू शकेल. पित्याची सेवा करा. प्रवास घडतील.
मिथुन:– संमिश्र दिवस आहे. आरोग्यात सुधारणा होईल. कामे पुढे सरकतील. जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या.
कर्क:- धार्मिक उपासना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. सिद्धी प्राप्त होईल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील.
सिंह:– कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना उत्तम यश मिळेल. संशोधनात प्रगती होईल. भाऊबंद भेटतील. संकट टळेल.
कन्या:- अंदाज अचूक ठरतील. ग्रंथ मैत्रीचा आनंद घ्याल. कार्यकुशलता वाढेल. न्याय मिळेल.
तुळ:- कुटुंब स्थानात चंद्र आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. मन आनंदी राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.
वृश्चिक:– तृतीय स्थानातील रवीशी चंद्राचा शुभ योग आहे. पराक्रम गाजवाल. धाडसी निर्णय घ्याल.
धनु:- अजूनही फारशी अनुकूलता नाही. मागील कामे पुढे चालू अशी परिस्थिती आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे पुढे सरकतील.
मकर:– अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. चांगली वागणूक मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ:– प्रतिकूल रवी मुळे आरोग्याच्या तक्रारी असल्या तरी सूर्य उपासना केल्यास त्या दूर होतील. नोकरीत अधिक काम करावे लागेल.
मीन:- उत्तम कालावधी आहे. सरकारी मान मरातब मिळू शकतो. उच्च अधिकाऱ्यांशी ओळखी होतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
