ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
“आज शुभ दिवस” पौष शुक्ल द्वादशी.हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मृग.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- प्रशंसा होईल. कीर्ती पसरेल. आर्थिक लाभ होतील. राज कृपेचा लाभ होईल.
वृषभ:- उत्तम धनलाभ होईल. अधिकार वाढतील. मत मतांतरे मिटतील.अनैतिक मार्ग टाळा.
मिथुन:- प्रिय व्यक्ती नाराज होऊ शकते. चोरीचे भय आहे. श्री दत्तगुरु अनुकूल फळे देतील.
कर्क:- संमिश्र दिवस आहे, नोकरीच्या ठिकाणी विनाकारण वाद विवाद संभवतात. उग्र कार्य टाळा.
सिंह:- उत्तरार्ध अधिक चांगला आहे. प्रेमात यश मिळेल. मात्र शेअर्स मध्ये नुकसान संभवते.
कन्या:- नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. पुण्य काम घडेल. वाहन दुरुस्ती करावी लागेल.
तुळ:- दिवसाचा पूर्वार्ध प्रतिकूल आहे. मात्र दुपारनंतर अनुकूलता वाढेल. उधारी वाढेल. फळ मिळण्यास उशीर लागेल.
वृश्चिक:- दिवसाचा पूर्वार्ध उत्तम आहे. कोर्ट कामात यश मिळेल. सामाजिक करीत सहभागी व्हाल. चैनीवर खर्च कराल.
धनु:- सप्तमी स्थानी चंद्र आहे, त्याचा शुक्राची प्रतियोग आहे. मन अस्वस्थ राहील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून त्रास संभवतो.
मकर:- संमिश्र दिवस आहे. स्वतःच्या आवडीसाठी खर्च कराल. काही शंका उपस्थित होतील.
कुंभ:- अनुकूल शुक्र पंचमातील चंद्राशी प्रतियोग करत आहे. वस्त्र लाभ होईल. नवीन प्रयोग नकोत. अंदाज चुकू शकतात.
मीन:- अनुकूल दिवस आहे. छोटे प्रवास घडतील. आनंद यात्रेत सहभागी व्हाल. मान सन्मान मिळतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
